
इचलकरंजी | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सुचनेनुसार पाठविले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्ष कामाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षकपदी शशांक बावचकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग येथील तालुकाध्यक्ष, नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये संघटना बळकटीसाठी नेमके काय करणे आवश्यक आहे याचा अहवाल पंधरा दिवसात द्यावा असेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा तळ कोकणातील महत्त्वाचा जिल्हा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे याचा विचार करून प्रदेश काँग्रेसने प्रभारी म्हणून काम केलेल्या शशांक बावचकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यास अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन व बैठका घेऊन पक्ष संघटना बळकट करणेवर भर देणार असलेचे शशांक बावचकर यांनी सांगीतले.