
इचलकरंजी : सफाई कामगारांना भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार चाळ पाडून त्याठिकाणी घरकुले बाधण्याचा निर्णय झाला. यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांची शिष्टाईला यश आले. सफाई कामगारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय तात्पुरते स्थगित केलेची घोषणा माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केली. मीटिंग मध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे काम वेळेत नाही झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला.
०४/०४/२५ रोजी दिलेल्या उपोषण मागे घेण्याची विनंती केलेल्या पत्रातील माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांना चुकीची दिली आहे. हे त्या परिसरात फिरून लघु चित्रपट केलेला आमदार व आयुक्त यांना दाखवण्यात आले. त्या परिस्थिती बाबत चुकीची माहिती चार भिंतीच्या आत बसून देण्याऱ्या अधिकाऱ्यावर विजय रजापुरेंंना चौकशीचे आदेश मीटिंग मध्ये आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले.
भाग्यरेखा चित्रमंदिर समोर असलेली कामगार चाळ इमारत पाडून ठिकाणी जी+3 लिफ्ट सह त्या ठिकाणच्या परिसरात सांस्कृतीक हॉल, बागीच्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, व्यायाम शाळा, वाचनालय, या योजनेतून बांधण्यात येणार आहे. आणि फक्त जी+2 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजनेत बसणाऱ्या लाभार्थीना देण्यात येणारं आहे. त्यावर पुन्हा २८ एप्रिल रोजी बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. व १५ दिवसात मंजुरी साठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असा निर्णय झाला.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजना ही जर महाराष्ट्र भर सर्व सफाई कामगार मोफत घरे बांधून द्यावयची असेल तर २५ वर्ष सेवेची अट १५ वर्ष करावी. असे मागणीचे निवेदन आम. डॉ. राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कडे सर्व लभार्थी व कामगार संघटना यांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी निवेदन दिले. या बाबत आम. डॉ. राहुल आवाडे यांनी प्राधान्याने विचार करू असे आश्वासन दिले. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी दिली.