
भारतीय पुरुष क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष अतिशय खास ठरलं. जून 2024 रोजी टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला. टीम इंडियाने तब्बल 18 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. परंतु जुलैनंतर भारतीय पुरुष संघाचे पुढील सहा ,महिने अतिशय कठीण राहिले. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध भारतात झालेली सीरिज 0-3 ने गमावली. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघ अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळणार आहे. तेव्हा या स्पर्धा नेमक्या कधी आणि कुठे होतील याविषयी जाणून घेऊयात.
सिडनी टेस्ट (बॉर्डर गावकर ट्रॉफी) :
2025 बद्दल बोलायचं झालं तर नवीन वर्षात टीम इंडिया त्यांचा पहिला सामना हा 3 जानेवारी रोजी सिडनी येथे खेळत. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला जिंकणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2-2 अशा बरोबरीत सुटेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत देखील ते टिकून राहतील.