
इचलकरंजी | इचलकरंजी शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची आणि सामाजिक जाणीव ठेवनारी कृती घडली आहे. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रवी रजपुते वाढदिवस गौरव समितीच्या वतीने चिकोडी गल्ली, भोणे माळ परिसरात स्वखर्चातून कूपनलिका खुदाई करण्यात आली. या कार्याचा शुभारंभ उद्योजक प्रशांत पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला.
इचलकरंजीतील महिलांसाठी पाणी समस्या ही नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 12 मधील चिकोडी गल्लीतील महिलांनी वेळोवेळी पाण्याच्या स्थायी उपाययोजनेसाठी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माजी उपन्गराध्यक्ष रवी रजपुते यांनी वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट म्हणून स्वखर्चातून कूपनलिका खुदाई करून दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, महिलांनी याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दत्ता जाधव, अरुण मस्कर, जयवंत चव्हाण, अजित व्हनुगरे, बाळु वडगांववे, शौकत नदाफ, युवराज केर्ले, हिमांशु घाटे, मोनिक व्हनुगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः कविता व्हनुगरे, सोनाली शिंदे, सुनीता शिंदे, सारिका ठाणेकर, प्रिया बागडे, पूजा कार्वेकर, आरती पवार, रुकसाना मुल्ला, शायरी फिरजादे आदी महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
रवी रजपुते यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधानाची भावना असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी केलेला हा विधायक उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
ReplyForwardAdd reaction |