राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्रतर्फे २२ व २३ मार्चला विशेष उपक्रम
इचलकरंजी : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र ही अंध व्यक्तींनी अंधांसाठी चालवलेली बिगर राजकीय सामाजिक संघटना असून, गेली ४७ वर्षे अंधांच्या शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कार्यरत आहे. २०२० सालापासून या संघटनेची कोल्हापूर जिल्हा शाखा जिल्ह्यातील दृष्टिहीन बंधू-भगिनींसाठी कार्यरत आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून २२ आणि २३ मार्च २०२५ या कालावधीत अंध भगिनींसाठी विभागीय स्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम त्यागी भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे पार पडणार आहे. पुणे विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांतील शंभर महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
🔹 सहभागी महिलांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था
🔹 विजेत्यांना बक्षीस वितरण आणि सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू
🔹 अंध भगिनींना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी
या उपक्रमासाठी संघटनेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क:
📞 बशीर शेख – 8484804354
📞 यशार्थ पाटील – 9922567108
📞 स्वप्नाली तेरदाले – 8208300558