
इचलकरंजी | नागपूर ते रत्नागिरी महामार्गावरील चोकाक ते अंकली गावातील अधिग्रहण होणार्या शेतकर्यांच्या जमिनी बागायती आहेत. यापैकी हजारो एकर जमीन राष्ट्रीय महामार्गात जाणार आहे. त्याशिवाय त्यांची घरे, विहीरी, बोअरींग, झाडं यांचेही प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी अधिग्रहण होणार्या जमिनींना बाजारभावाच्या चौपट मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आण्णासाहेब शहापुरे यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समिती जैनापूरच्या वतीने विक्रम पाटील आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी भेट देऊन संघटनेच्यावतीने पाठींबा दर्शवल्यावर ते बोलत होते. यावेळी संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष बसगोंडा बिरादार, कार्याध्यक्ष सतिश मगदूम, संघटक बाळगोंडा पाटील, शितल देवमोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.