इचलकरंजी | इचलकरंजी येथील यशवंत कॉलनी परिसरात राहणारी नंदिता कन्हैयालाल मुथा यांची पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधिशपदी निवड झाली आहे.
नंदिताचे शिक्षण बी.एस.एल.एल.बी शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर येथे झाले असून पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधिश कनिष्ट स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदी तिची निवड झाली.
नंदिताचे प्राथमिक शिक्षण माई बाल विद्यामंदीर येथे तर माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कुल येथे झाले आहे.
अतिशय खडतर असणाऱ्या या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिने यश मिळवले,संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यातून ११४ विद्यार्थ्याची निवड झाली आहे यामध्ये नंदिताचा ४४ वा क्रमांक आहे.
नंदिता या अगदी साधारण कुटुंबातील असुन आई गृहिणी तर वडिल नोकरी करतात.भाऊ वकील आहे.
अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नंदिताने हे यश प्राप्त केले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच विचारे मॅडम,गणेश शिरसाट सर आणि ॲड.विजय मुथा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे नंदिताने सांगितले.
