
इचलकरंजी | येथील राहुल आवाडे स्पोर्टस्च्या खेळाडूंची पोलिस दलात निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्वच खेळाडूंचा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यातही सर्व खेळाडूंना जी मदत, सहकार्य लाभेल ते करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राहुल आवाडे स्पोर्टस्च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करण्यासह अशा खेळाडूंना स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन केले जाते. त्याच माध्यमातून अनेक खेळाडूंची विविध स्तरावर निवड झाली आहे. तर बहुतांशी खेळाडूंची पोलिस दलात निवड झालेली आहे. त्यामध्ये अजित पाटील (पीएसआय), संदीप कांबळे (सिंधुदुर्ग पोलिस), अक्षय माने (नवी मुंबई एसआरपीएफ), आदित्य आजगेकर (रायगड पोलिस), ओंकार कुंभार (कोल्हापूर पोलिस), सौरभ भगत (मुंबई पोलिस), साक्षी कंदले (जळगाव पोलिस), मंजुळा सरडे (जळगांव पोलिस), मानसी मोरे (मुंबई पोलिस), हर्ष चव्हाण, सौरभ माने, अभिषेक माने (इंडीयन आर्मी), आशिष मगदूम (मर्चंट नेव्ही) यांची नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वीही अनेक खेळाडूंची शासकीय सेवेत निवड झालेली आहे. या सर्वांना आमदार राहुल आवाडे यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक नितीन वाघमोरे, विनोद वाघमोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याप्रसंगी राहुल घाट उपस्थित होते.