
इचलकरंजी | नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात शहरातील प्रतिथयश दि इचलकरंजी मर्चंटस को-ऑप. बँकेस 1 कोटी 14 लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील यांनी दिली. बँकेचा एकूण व्यवसाय 233 कोटी इतका झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सन 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेकडे एकूण ठेवी 144 कोटी 60 लाख इतक्या झाल्या आहेत. बँकेने 88 कोटी 40 लाख इतके कर्ज वाटप केले असून बँकेची एकूण गुंतवणूक 54 कोटी 99 लाख इतकी आहे. बँकेचे भागभांडवल 5 कोटी 3 लाख इतके असून बँकेचा स्वनिधी 11 कोटी 31 लाख इतका झालेला आहे.
बँकेने इचलकरंजी शहर व परिसरातील 6 शाखांतून सामान्य शेतकर्यांपासून, छोटे-मोठे व्यापारी, उद्योजकापर्यंत सर्वांच्या गरजा ओळखून नियोजनबध्द व पारदर्शक कार्यपध्दतीमुळे सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरली आहे. त्यामुळेच सर्वच स्तरावर बँकेस उत्कृष्ट प्रगती साधता आली आहे. बँकेचा सीआरएआर प्रमाण 17 टक्के इतका भक्कम आहे. बँकेने सलग दुसर्या वर्षी नेट एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यातून आयकर 28.75 लाख व इतर तरतुदी वजाजाता निव्वळ नफा 74 लाख 69 हजार इतका झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या बँकेच्या 6 शाखा कार्यरत असून चालू वर्षी दोन नवीन शाखा सुरु करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन गजानन लोंढे, व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन विलास गाताडे, संचालक इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे, कमलाकर पालनकर, बाळासाहेब बरगाले, राजेंद्र शिरगुप्पे, भूषण शहा, राजकुमार पाटील, मधुकर पांढरे, दशरथ मोहिते, व्यंकटेश शहापूरकर, संचालिका शोभा कडतारे, विजयश्री गौड, तज्ञ संचालक संजय व्हनबट्टे, विजय कामत तसेच बँकेचे जनरल मॅनेजर दिपक काटकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.