
इचलकरंजी : ब‘ाह्मण सभेच्या वतीने पारंपारिक पधदतीने परशुराम जन्मोत्सव विविध उपक‘मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. तर मु‘य मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या सं‘येने सहभागी झाले होते.
परशुराम जन्मोत्सवानिमीत्त धाकट्या वाड्यात इचलकरंजी ब्राम्हण सभा आणि ब्राम्हण समाजातील विविध संघटनांच्या वतीने वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंन्दांच्या मंत्रोच्चारात पूजा, पवमान अभिषेक सोहळा झाला. यावेळी ज्ञाती बंधवांनी श्रीराम रक्षास्त्रोत पठण केलं. सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवुन भव्य शोभा यात्रेला प्रारंभ झाला. पारंपारीक वाद्यांचा गजर, पराशुरामावर आधारीत गीतं आणि आवेषपुर्ण घोषणाबाजी करत निघेलेल्या या शोभायात्रेत पारंपारीक वेशभूषा केलेले समाजबांधव मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

मुख्यमार्गावरुन शोभायात्रा गावभागातील श्रीराम मंदिरात आल्यावर जन्मोत्सव, पाळणा, आरती आणि महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. यावेळी उल्हास लेले यांनी ब्राम्हण सभा आणि ब्राम्हण समाज नेहमीच सर्व समाजातील विविध जयंती, पुण्यतीथीच्या निमित्तानें नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत असतो. ब्राम्हण सभेच्या या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा तसेच ब्राम्हण समाजाची एकी, भगवान परशुरामांचा परशु हाती घेऊन कार्य करण्याची गरज व्यक्त केली. संपदा ओगले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्री परशुराम यांची जयंती एकत्र सादर करताना भक्ती-शक्तीचा संगम अनुभवत असल्याचं सांगितले.
दरम्यान, माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास दिगंबर कुलकर्णीं, अॅड. मोरेश्वर सहस्रबुद्धे, सुरेश जोशी, श्रीपाद कुलकर्णी, शैलेश गोरे, संजय मैंदर्गी, सतीश पळसुले, त्रिगुण पटवर्धन, डॉ. पद्मनाभ कुलकर्णीं, प्रा.मिलिंद दांडेकर, दिग्विजय कुलकर्णीं, मनिष आपटे, यांच्यासह समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्ञाती बांधव उपस्थित होते.