
इचलकरंजी : शहर परिसरात गत काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने काेल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी साेमवारी पंचगंगा नदीघाट तसेच पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या छावण्यासाठी महापालिकेच्या विविध शाळांची पाहणी केली.
सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ हाेत चालली आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 2 ुटांनी वाढ झाली आहे. तर हवामान खात्यानेही काेल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पंचगंगा नदीघाट तसेच पुरग्रस्तांची छावण्यांमध्ये साेय करण्यासाठी महापालिकेच्या शाळांची पाहणी करुन संबंधित अधिकाèयांना सतर्कतेच्या सुचना दिल्या. यावेळी अतिरीक्त आयुक्त सुष्मा शिंदे, सह आयुक्त विजय राजापुरे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशाेक कुंभार, नगरअभियंता महेंद्र क्षिरसागर, अभियंता बाजी कांबळे, आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.