
इचलकरंजी : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दुचाकी चालवत वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाच्या विराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. प्रभाकर धर्मा कसबे (वय 68, रा. बंडगर माळ) असे वृद्धाचे नाव आहे. तर संताेष तात्यासाहेब शिंदे (वय 51 रा. तीनबत्ती चाैक) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमर नामेदव लाेखंडे (वय 45) यांनी िफर्याद दिली आहे.
याबाबत पाेलिसांतून मिळालेली माहिती अशी, हातगाड्यावरुन िफरुन लहान मुलांची खेळणी विकणारे प्रभाकर कसबे हे 25 मे राेजी रात्री साडेआकरा वाजता औषध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने शाेध घेतला असता त्यांना दुचाकी धडक दिल्याने गंभीर जखमी झाले हाेते. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेले असता इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर तेथील वैद्यकिय अधिकाèयांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अमर लाेखंडे यांच्या िफर्यादीनुसार दुचाकीस्वार संताेष शिंदे याच्या विराेधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.