
इचलकरंजी | सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलात जनरल इंजिनियर रिझर्व फोर्समध्ये कार्यरत सुरेश लक्ष्मण माने (वय 58) यांचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल.
इचलकरंजीतील सुरेश माने हे भारतीय सैन्य दलात जनरल इंजिनियर रिझर्व फोर्समध्ये कार्यरत होते. ते सुट्टीसाठी घरी आले होते. देशभरात त्यांनी विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांना प्रकृत्ती अस्वास्थ्यामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते.
मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावभागाचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने, कार्याध्यक्ष कदंबा कांबळे, कॅप्टन रमेश काळे, मोहन कोगे, बापू मुल्ला, शंकर मेहता, संभाजी गावडे, हरी धुमाळ, दगडु कांबळे, अरविंद माळगे, निवृत्ती सुर्यवंशी, सैनिक वेल्फेअर असोसिएशन टाकळीवाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश निर्मळे, सैनिक संघटना जयसिंगपूरचे नामदेव पाच्छापुरे, संजीव सुनगार, अॅड. अनिल करंगळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवाराने अखेरचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या पथकाने हवेत फैरी झाडत त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर शासकीय इतमामात पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.