
इचलकरंजी/प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग अंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालया कडून इचलकरंजी महानगरपालिकेच्या ताफफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले 18.5 टन आणि 7.5 टन क्षमतेचे सक्क्षन अँड जेटिंग मशीनसह वाॅटर रिसायकलिंग सिस्टीम (पाण्याचा पुनर्वापर) अशी दाेन वाहने दाखल झाली आहे. या वाहनांचे पुजन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदु परळकर उपायुक्त अशाेक कुंभार उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सद्यस्थितीत शहरातील ड्रेनेज लाईन साई एकाच जेटिंग मशीन द्वारे करण्यात येत असल्याने ड्रेनेज साईच्या कामांमध्ये मर्यादा येत हाेत्या. यामुळे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे मागणीनुसार ही वाहने मिळाली आहेत. या मशीनद्वारे लगेचच काम सुरू करुन या कामाची पाहणी आयुक्त यांनी सर्व अधिकारी यांचे समवेत केली आणि याबाबत आवश्यक त्या सुचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या.
या मशीनच्या वापरामुळे ड्रेनेज लाईन चाेकअप हाेण्याचे प्रमाण नगण्य राहणार असून ड्रेनेजचे चाेकअप काढण्यासाठी या पूर्णपणे मनुष्य विरहित असलेल्या मशिनरीचा वापर इचलकरंजी महानगरपालिके र्माफत करण्यात येणार आहे. या दाेन्ही मशीनच्या वापरामुळे महानगर पालिकेची आर्थिक बचत हाेणार आहे. यावेळी आरती खाेत, राेशनी गाेडे, डाॅ. सुनीलदत संगेवार, अभय शिराेलीकर, बाजी कांबळे, प्रशांत आरगे, इसरार बेग, हर्ष माळगे तसेच या वाहनांचे राज्य स्तरावरील व्यवस्थापन असलेल्या आर्यन कंपनीचे प्रतिनिधी विक्रम गायकवाड, सर्व्हिस इंजिनियर वैभव सूर्यवंशी यांचेसह आराेग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित हाेते.