
इचलकरंजी – विनायक कलढोणे
जुना एस.टी. स्टँड चौकात शुक्रवारी दुपारी सगळं काही नेहमीप्रमाणे चाललं होतं. पण एका चोरट्याने “मिशन इम्पॉसिबल”च्या स्टाईलमध्ये एक स्टंट करून १६ हजार रुपये घेऊन हवेतच नाहीसा झाला!
एम.एस. इंटरप्रायझेस नावाचं दुकान. दुपारची वेळ. लोक आपल्या कामात, दुकानदार थोडा बाहेर. आणि तेवढ्यात एन्ट्री झाली गुप्तहेर भैय्याची! थेट काउंटरवर उडी मारली, नोटा उचलल्या आणि बाहेर पडताना कोणतीही ‘बिलिंग’ न करता सरळ एक्सिट गेट!
विशेष म्हणजे, सगळं प्रकरण सीसीटीव्हीत कैद झालंय – म्हणजे एखादा छोटा ‘शॉर्ट फिल्म’ तयार व्हायला हरकत नाही. काउंटरवरची झेप, गाठलेली रोकड आणि शिताफीने केलेलं ‘पलायन’ – अचूक टायमिंगचा मास्टरक्लास म्हणावा असा प्रकार.
आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ठिकाणी भेट दिली आणि “या टायमिंगचा मास्टर कोण?” याचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, शहरात व्यापारी मंडळी म्हणतायत – “साहेब, आता सीसीटीव्ही असून उपयोग काय, चोर तर हिरो बनतोय!”
टीप: दुकानदाराच्या चुका दाखवण्याचा कुठलाही उद्देश नाही. चोरट्याच्या शिताफीला थोडा ‘फनी ट्विस्ट’ देऊन बातमी सादर करण्यात आली आहे.