
इचलकरंजी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत असणार्या शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी येथे शरद कृषीकन्यांकडून शेतीविषयक मोबाईल प व गोठा निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले
शेतीबाबत आधुनिकता व जागरूकता यामुळे शेतकर्यांचा फायदा होणार आहे. कृषीकन्या आर्या गायकवाड, सृष्टी गुरव, साक्षी जाधव, मंजुषा मोरबाळे, मसिरा मुल्ला, रिया वडगांवकर यांनी जनावरांची घ्यावयाची काळजी, गोठा निर्जंतुकीकरण आणि गोठा व्यवस्थापन याची सखोल माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. ग्रामीण भागात गोठ्यांची स्वच्छता केली जाते परंतु निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याची खबरदारी म्हणून आम्ही गोठा निर्जंतुकीकरणचे प्रात्यक्षिक सादर केले. याचा निश्चितच शेतकर्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच मोबाईलद्वारे शेतीविषयक असलेले विविध मोबाईल पचे मार्गदर्शन केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमालाची विक्री कशी करावी, कृषीउत्पन्न बाजार समितीचा चालू दर कसा जाणून घ्यावा तसेच हवामानाचा अचूक अंदाज, शेती पद्धती, यंत्र सामग्री, बाजारभाव, पेरणीची परिस्थिती अशा प्रकारची माहिती शेतकर्यांना दिली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश कोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद सरतापे, प्रा. सुरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.