
इचलकरंजी | येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबचा सन 2025-26 वर्षासाठी पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. क्लबच्या अध्यक्षपदी सुनिल कोष्टी तर सेक्रेटरीपदी किरण कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सन 2025-26 साठी नवीन पदाधिकारी व संचालकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदी श्री सुनिल कोष्टी, सेक्रेटरी श्री किरण कटके, सह सेक्रेटरी सौ. संगिता लडगे, ट्रेझरर श्रीमती जयश्री चौगुले यांची निवड करण्यात आली. तसेच सदाशिव काजवे, प्रभाकर उरणे, आण्णासो नंदाई, हेमंत कवठे, रमेश पाटील, बाबासो पाटील (जांभळीकर), मल्लिकार्जुन तेगी, सौ. निर्मला मोरे, शैलजा मिरगे व माया होगाडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या पदग्रहण सोहळयासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रीक्टचे असि गव्हर्नर ये कमलेशजी ल, इचलकरंजी रोटरी सेंट्रल क्लबचे अध्यक्ष घन:शाम सावलानी, सेक्रेटरी अमर कांबळे, आपटे वाचन मंदिर अध्यक्षा सौ. सुषमा दातार प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रीक्टचे सेक्रेटरी तथा प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते. स्वागत करुन प्रास्ताविकात मावळते अध्यक्ष अॅड. विश्वासराव चुडमुंगे यांनी गत वर्षभरात केलेल्या कार्याचा वृत्तांत मांडला. मागील वर्षाच्या कामकाजा अहवालाचे वाचन रामचंद्र निमणकर यांनी केले.
पाहुण्यांचा परियच जुगलकिशोर तिवारी, किरण कटके, काशिनाथ जगदाळे व सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी करून दिला. मावळते अध्यक्ष अॅड. विश्वासराव चुडमुंगे यांनी नुतन अध्यक्ष सुनिल कोष्टी यांना कॉलर प्रदान केली. तर इतरांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी येणार्या वर्षात नवीन सामाजिक उपक्रम व ज्येष्ठांच्यासाठी व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यकम घेण्याचा मनोदय व्यक्त केला. कमलेश लड्डा यांनी शहर व परिसरामध्ये संयुक्तपणे समाजिक व सांस्कृतिक उपक्रम घेण्यासाठी रोटरी सेंट्रल सहकार्य करेल याची ग्वाही दिली.
सूत्रसंचालन सौ. शारदा कवठे यांनी केले. आभार सौ. निर्मला मोरे यांनी मानले. या पदग्रहण सोहळ्यासाठी माजी अध्यक्ष शिवबसू खोत, एम. के. कांबळे, सुर्यकांत बिडकर, सर्जेराव घोरपडे, अजित कोईक, महावीर कुरूंदवाडे, मोहनराव भिडे, डी. एम. बिरादार, विजय हावळे, आप्पासाहेब कुडचे, कुमार मालकापुरे, डॉ. कुबेर मगदूम, ज्ञानदेव मेटे, विजय पोवार, गजानन शिरगुरे, दिलीप भंडारे, दिलीप शेट्टी, जयप्रकाश शाळगांवकर, प्रदिप लडगे, मनोहर कुराडे, हिमांशु मिरगे, बाळासाहेब कवडे, सतिश कोष्टी, आनंदी मेटे, अनिल ज्वारे, सदाशिव मेटे, लक्ष्मण घंटा, शंकर लाटणे, काशिनाथ टकले, सूर्यकांत काजवे, प्रमोद लाटणे, यशवंत कांबुरे, विश्वनाथ एकार, वसंत हिरुगडे, शांताराम वठारे, वैभव डोंगरे, सौ विना श्रेष्ठी, श्रीमती प्राजक्ता होगाडे, सौ. राजश्री वाटेगावे, सौ. मनिषा कोष्टी, सौ. शकुंतला जाधव, सौ. रेखा लाटणे, सौ कविता कटके, सौ. शिला बुबनाळे, सौ विश्रांती कांबुरे, सौ. शोभा मेटे, शैलजा सवदीमठ, निता दोड्डण्णावर, सौ. मिता लाटणे, अॅड. सौ. मृणाल माने, सुरेखा खोंद्रे, आनंदी हजारे, सौ. रेखा कांबळे, सौ. सुप्रिया कोष्टी, सौ. सुरेखा मगदूम, सौ. ललिता बिरादार, सौ. शालिनी जगदाळे यांचेसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.