
इचलकरंजी – विनायक कलढोणे
इचलकरंजी, १८ जुलै – पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे आज सकाळी ९ वाजता जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

१६ जुलै रोजी पातळी वाढल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल बंद करण्यात आला होता. मागील दीड महिन्यात तिसऱ्यांदा पूल बंद व खुला करण्यात आला आहे. महापालिकेने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

दि. १६ जुलै रोजी पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेच्या वतीने जुना पूल वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पाण्याच्या पातळीत झालेल्या घटीनंतर आज, दि. १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.