
इचलकरंजी | इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षी दिला जाणार मानाचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ यंदा सामाजिक व सांस्कृतिक व वस्त्रनिर्मिती क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल श्रीकांत प्रभूदेसाई यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार’ या पुरस्कारासाठी तुषार कुलकर्णी, आदित्य रुईकर, श्रीमती वरदा उपाध्ये व सौ. मिनल कुलकर्णी या उद्योजक, साहित्य, शैक्षणिक व जोतिषशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्ञाती बंधु-भगिनींना देण्यात येणार आहे. तर अध्यात्मिक क्षेत्रातील ‘वेदोनारायण पुरस्कार’ वेदमूर्ती गोपाळ विष्णु वडेर यांना आणि ‘सेवाभावी संस्था’ पुरस्कार माणुसकी फौंडेशन इचलकरंजी यांना प्रदान करण्यात येत आहे.
शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक पुण्यदिनी या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्राह्मण ज्ञाती बांधवांचा विशेष गौरव तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी, विद्यर्थिनींचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्के व इयत्ता 12 वी 85 टक्के गुण प्राप्त विद्यार्थी तसेच इयत्ता 5 वी आणि 8 वी मधील एनएमएमएस आणि एनटीएसएमटीएस, नेट-सेट, युपीएससी, स्कॉलरशिप, तसेच कला, क्रीडा, आरोग्य व अध्यात्मिक, योग क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्कार मिळवलेल्या गुणीजणांचा गौरव करण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिका व योग्य सर्टिफिकेटच्या झेरॉक्स प्रतिसह 20 जुलै 2025 आखेर ब्राह्मण सभा कार्यालय झेंडा चौक इचलकरंजी येथे नांवे नोंदवावीत, असे आवाहन ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे.