

इचलकरंजी | दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने दि इचलकरंजी यार्न मर्चंट असोसिएशनला सूताच्या बिलावर सुतामध्ये मिश्रीत घटक व त्याची टक्केवारीचा स्पष्ट उल्लेख, ज्या काऊंटचे सुत त्याच काऊंटचे बिल, ज्या मिलचे सुत त्या मिलच्या कोनावर त्याच काऊंटचे लेबल लावूनच बिले देणेत यावी असे निवेदन दिले.
सुत विक्री करीत असताना सुत व्यापारी बिलावर सुताचे नांव, त्याचा प्रकार, त्याचा काऊंट व मिक्सींगचे प्रमाण याचा तपशिल देत नाहीत. सुत व्यापार्यांकडून आलेल्या सुतातील भेसळीमुळे कंट्यामनेशन व पट्टा-पट्टी आदीची तक्रार कापड व्यापार्यांकडून येऊन वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे कारखानदारांचे अडत्या, ट्रेडर व व्यापारी पैसे कट करीत असल्यामुळे कारखानदारांचे नुकसान होत असलेच्या तक्रारी असोसिएशनकडे आलेल्या आहेत.
त्यास अनुसरून इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने दि इचलकरंजी यार्न मर्चंट असोसिएशनला हल्ली काही सूत व्यापारी यंत्रमागधारकांना सुताचा पुरवठा करीत असताना बिलावर दिलेल्या सुताचा तपशिल नसणे, सुताच्या बाचक्यावर तपशिल नसणे तसेच सुताच्या कोनाच्या आतमध्ये मिलचे नांव, सुताचा काऊंट, सुताचा प्रकार, मिक्सींगची माहितीचे स्टिकर नसणे अशा प्रकारचा पुरवठा करीत आहेत. कारखानदार कापड उत्पादन करीत असताना कमी कापड येत असलेने सूतचा काऊंट काढणेसाठी टेस्टींगलॅबमध्ये सुत दिले असता. कोनावर सुताच्या तपशिलाचा स्टिकर नसलेने टेस्टींग लॅबवाले अननोन मिल असा शेरा मारून रिपोर्ट देत आहेत. रिपोर्टमध्ये आलेला काऊंट व प्रत्यक्षात ट्रेडिंगधारकाने दिलेल्या सुताच्या काऊंट यामध्ये फार फरक पडत आहे. कारखानदाराने याची विचारणा ट्रेडिंगधारकाकडे केली असता. बिम पूरवठा करणारा ट्रेडिंगधारक तो रिपोर्ट मिलचे नांव नसल्याने स्विकारण्यास टाळाटाळ करून तो आमचा रिपोर्ट नाही असे सांगत आहे.
असे प्रसंग टाळणेसाठी तसेच असे प्रसंग घडू नयेत म्हणून दि इचलकरंजी यार्न मर्चंट असोसिएशनने आपल्या सभासदांना सुताच्या बिलावर दिलेल्या सुतामध्ये किती टक्के व कोणकोणत्या घटकांचे मिक्सींग आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा व सोबत लॅब रिपोर्ट जोडावा. विक्री केलेल्या सुताचा येणार्या काऊंटचा देखिल उल्लेख बिलावर करणेत यावा. व ज्या काऊंटचे सुत आहे त्या काऊंटचे बिल दिले जावे. त्याचबरोबर ते ज्या मिलचे सुत पुरवठा करतात त्या मिलच्या कोनावर सदर सुतामध्ये प्रत्यक्षात येणारे काऊंटचे लेबल लावणे विषयी सुचना करावी अशा आशयाचे निवेदन दिलेचे इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.