तारदाळ | हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या ढिसाळ कारभाराबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आले.
तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत ५३ कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे.सदर जल जीवन योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षामुळे सदर योजनेच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी निर्माण झाल्या असून सदर योजनेचे काम पूर्णपणे रखडलेले आहे.त्या अनुषंगाने संबंधितावर कार्यवाही व्हावी.या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी गुरुवारी सकाळी तारदाळ ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते
.यावेळी अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला आपला जाहिर पाठिंबा दर्शविला.सदर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सदर योजनेसंबंधी पाठपुरावा करीत असल्याचे लेखी पत्र उपोषणकर्ते विनोद कोराने यांना देत सुरू असलेले उपोषण थांबविण्याची विनंती केली.यावेळी सदरचे लेखी पत्र शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते देत उपोषण कर्ते यांना सरबत देण्यात आले.