
इचलकरंजी | लोकशाही बळकट करण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. महानगरपालिका सभागृहात संपन्न माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
28 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सोमवारी महानगरपालिका सभागृहात अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी, माहिती अधिकार अधिनियमबाबत विस्तृत माहिती देत माहिती अधिकाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहा. आयुक्त विजय राजापुरे यांनी केले. या कार्यशाळेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे माहिती अधिकारी अजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उप लेखापाल रामचंद्र कांबळे, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, कर अधिक्षक दिपक खोत, गणेश शिंदे,अनिस पठाण, प्रशांत आरगे, विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, विद्युत अभियंता इसरार बेग, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर यांचेसह महानगर पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
