इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक आज काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. सर्व घटक पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बैठकीच्या सुरुवातीला श्री. उदयसिंग पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करत उपस्थितांचे मन:पूर्वक स्वागत केले. त्यानंतर भाजपच्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने निवडणूक रिंगणात उतरावे, असे आवाहन श्री. शशांक बावचकर यांनी केले.
महाविकास आघाडीचा महापौर महानगरपालिकेत बसविण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार श्री. मदन कारंडे यांनी व्यक्त केला. तसेच फेर-आरक्षणाबाबत आवश्यक ती माहिती श्री. प्रकाश मोरबाळे यांनी उपस्थितांना दिली.

या बैठकीस प्रकाश मोरबाळे, उदयसिंग पाटील, अब्राहम आवळे, सयाजी चव्हाण, रणजीत जाधव, नितीन कोकणे, रवी गोंदकर, नागेश शेजाळे, अभिजित रवंदे, संतोष शेळके, बाबासाहेब कोतवाल, शेखर पाटील, मुन्ना खलिफा, राजेंद्र मुठाणे, बाजीराव कुंभार, संजय अथने, वसंत कोरवी, सदा मलाबादे, महेंद्र वनकुंद्रे यांसह महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
