
कृषी मंत्री असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी एकूण 300 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. कागदोपत्री पुरावा दाखवून एकूण 300 कोटींचा घोटाळा आणि भ्रष्टाचार धनंजय मुंडे यांनी केल्याचा आरोप धसांचा आहे.
तसंच आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल असा इशाराही धसांने दिला आहे. दरम्यान, याच घोटाळ्यावरून संबंधित भारतीय किसान संघानं तक्रार करणारं पत्र दिलं होतं. ते पत्र मुंडे यांचा राईटहँड वाल्मिक कराड अधिकाऱ्यांसमोरच टराटरा फाडल्याचा दावा धसाने केला आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि कृषी खात्यावरून जे आरोप झाले त्यावरून आता तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी धसाने केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीनंतर धसांवर विरोधकांनी मॅनेज झाल्याचा आरोप केला होता. पण आता धसाने बाउन्सबॅक करत मुंडेंना चॅलेंज केलंय. दुसरीकडे कृषीमंत्री असताना बदली आणि पदोन्नतीत 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत रेकॉर्ड धसांनी मांडला आहे. मुंडे यांची भेट घेतली तरी लढाई सुरूच राहणार असं धस म्हणाले होते. आता 300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत धस मुंडे यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.