
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारणायाची धमकी मिळालेली असताना आता भाजप आमदाराला सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे. या प्रकरणी त्या आज दुपारी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत. श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याच दिसत आहे.
आमदारांची सुरक्षा कमी केल्यामुळे असे प्रकार वाढू लागलेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांची ठाम मते आहेत. या प्रश्नांवर त्या नेहमीच आवाज उठवत असतात.