
इचलकरंजीतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्याचा कॉ. मलाबादे चौक तसेच पूर्वीचा जनता बँक चौक येथे हा पुतळा उभारण्यात येणार आहे.ही संकल्पना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मांडली असून, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार राहुल आवाडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
या पुतळ्याच्या उभारणीमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी भावना स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्राथमिक प्रक्रिया सुरू केली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.