
इचलकरंजी | राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अहिल्याबाई होळकर शाळा क्रमांक 30 येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करुन करणेत आला.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये सादर केलेल्या प्रयोगांचे कौतुक करुन महानगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करुन शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रणजित पाटील, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांचेसह शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.