इचलकरंजी | नैराश्यातून 20 वर्षीय तरुणाने शहापूरातील बंद कारखान्याच्या खोलीत फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुदर्शन रमेश माळी (रा. रोटरी कॉलनी शहापूर) असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी संजय मल्लू माळी (वय 52 रा. जेकेनगर तारदाळ) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहापूरात दामोदर बुचडा यांच्या बंद कारखान्यात सुदर्शन माळी याने फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
