इचलकरंजी | व्यवसायात झालेल्या नुकसानीच्या तणावातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री हॉटेलच्या रुममध्ये घडली. अभिजित सुभाष पाटील (वय 42 रा. जोगेश्वरी मुंबई) असे त्याचे नांव आहे.
या प्रकरणी भाऊ पुष्कराज सुभाष पाटील (वय 45 रा. प्राईड इंडिया रोड शहापूर) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. अभिजित पाटील हे मुंबई येथे राहण्यास होते. त्यांना व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे ते तणावाखाली होते. यातूनच त्यांनी कोल्हापूर रोडवरील हॉटेल उपवनमधील रुममध्ये फॅनच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.