
इचलकरंजी | जनसामान्याच्या विश्वासास पात्र ठरलेल्या येथील सन्मती सहकारी बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय 475 कोटी 32 लाख इतका झाला आहे. आरबीआयच्या निकषाप्रमाणे व शासकीय लेखापरिक्षकांचे मार्गदर्शनुसार सर्व तरतुदी पुर्ण केल्या आहेत. बँकेला 3 कोटी 29 लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्हा. चेअरमन महादेव कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, बँकेच्या 12 शाखा असून 10 शाखा नफ्यात आहेत. सन 2024- 25 वर्षात 500 कोटी जवळपास व्यवसाय केला असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर प्रमाण 15.28 टक्के इतके ठेवले आहे. आर्थिक वर्षात भागभांडवल 9 कोटी 13 लाख जमा असून बँकेकडे 277 कोटी 29 लाख ठेवी आहेत. 198 कोटी 2 लाख इतके कर्ज वाटप केले आहे. बँकेने सरकारी कर्जरोखे व इतर बँकात 102 कोटी 55 लाख इतकी गुंतवणुक केलेली आहे. राखीव निधी व गंगाजळी 45 कोटी 80 लाख इतकी रक्कम ठेवलेली आहे. बँकेचे खेळते भांडवल 353 कोटी 12 लाख इतके आहे. सन 2025-26 या आर्थिक सालात बँकेने 400 कोटी ठेवीचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. लवकरच सांगली शाखा महावीर नगर वखारभाग जैन बोर्डींग येथे नवीन जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्थलांतरीत करत आहोत. बँकने शेतकरी, शेतमजूर, छोटे-मोठे उद्योजक, नोकरदार यांच्या आर्थिक गरज भागविण्यासाठी जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मदत करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयल केलेला आहे.
पत्रकार परिषदेत बीओएम चेअरमन डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, संचालक सर्वश्री शितल पाटील, प्रा. डॉ प्रद्युमकुमार कडोले, डॉ. पुरूषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे, आण्णासो मुरचिटे, चंद्रकांत पाटील, प्रदिप मणेरे, संजय चौगुले, प्रा. आप्पासाहेब पाटील, गिरीश देशपांडे, संजय कुडचे, संदीप माळी, सौ. वसुंधरा कुडचे, डॉ. सौ. निमा जाधव, मनिष पोरवाल, महावीर यळरूटे, सुनिल रेवणकर, असि. सीईओ समीर मैंदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार उपस्थित होते.