इचलकरंजी | किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून जमाव करुन दगडाने मारहाण केल्याने एकजण जखमी झाला. जैद उर्फ जाहिद लियाकत काझी (वय 20 रा. महालक्ष्मीनगर ग. नं. 3 शहापूर) असे जखमीचे नांव आहे. याप्रकरणी गिड्या वडर, सोन्या वडर, कर्या वडर (सर्व रा. जयभिमनगर झोपडपट्टी) आणि अन्य तिघे अशा सहाजणांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 10 मे रोजी जैद काझी याचा मित्र नदीम चौधरी व कर्या वडर यांच्यात रोडवर थांबण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. हा वाद जैद याने मध्यस्थी करत असताना सोन्या वडर याने त्याला शिवीगाळ करत धमकी दिली होती. या वादाच्या रागातून 11 मे रोजी रात्रीच्या सुमारास सहाजणांनी मिळून जैद याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगडाने मारल्याने तो जखमी झाला. पोलिस केस केलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीही जैद याला देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.