
इचलकरंजी | महानगरपालिकेच्या 33 प्राथमिक शाळा आणि राजषिॅ शाहु हायस्कुलमध्ये सोमवारी शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबराबेर पहिल्याच दिवशी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य देण्यात आले. तर इयत्ता पहिलीत दाखल 120 चिमुकल्या विद्यार्थ्यांचे एक रोपटे देत पर्यावरणपूरक स्वागत करण्यात आले. एकुणच आजचा शाळेतील प्रवेशोत्सव, शालेय साहित्य वाटप आणि पावसाळ्याचे वातावरण विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रत्येकी 2 गणवेश, वह्या, पुस्तके, बॅग, बुट यासह विविध 19 शालेय साहित्य देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी येणार्या सर्वच विद्यार्थ्यांचे शिक्षण मंडळ आणि महापालिकेचे अधिकारी, शिक्षक, भागातील लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले. शाळेच्या प्रवेशद्वारात आकर्षक सजावट करण्यात आली होती. शाळेत दाखल विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर उपायुक्त अशोक कुंभार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला होता.

आण्णा रामगोंडा शाळेत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, संजय भंडारे, मुख्याध्यापिका अलका शेलार, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, बांधकाम विभागाचे आकाश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शेटके आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हुतात्मा बाबु गेणु शाळेत आयुक्त पल्लवी पाटील, शिक्षण मंडळाचे इरफान पटेल, सामाजिक कार्यकर्ते तानाजी भोसले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शालेय साहित्याचे वाटप केले. तर पर्यावरणपूरक संदेश देताना शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी एक रोपटे भेट दिले. या रोपाचे संगोपन विद्यार्थ्यांनी पालकांसह करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सजवलेल्या वाहनांमधून वाजत-गाजत शालेय परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण
