
इचलकरंजी | इचलकरंजी बाल वयात मुलांच्यावर केलेले संस्कार है चांगल्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या पुढील आयुष्यात दरवळत राहतात व उपयोगी पडतात. त्यामुळे सक्षम पिढी घडते. जिजाऊंच्या चांगल्या संस्काराने शिवबा घडले व त्यांनी स्वराज्य उभे केले, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार व व्याख्याते प्रथमेश इंदूलकर यांनी काढले
ते रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या कार्यक्रमात ’संस्कार एक सुगंध’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी पडलेल्याना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वागत क्लबचे सेक्रेटरी रामचंद्र निमणकर यांनी केले. प्रोबस क्लबचे अध्यक्ष अॅड. विश्वासराव चुडमुंगे यांनी प्रास्ताविकात क्लबच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी माजी सचिव विजय पवार यांना सहकार भारतीचा उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रोजेक्ट कमिटी चेअरमन सुनिल कोष्टी, खजिनदार सौ. विना श्रेष्ठी, शिवबसू खोत, जयप्रकाश शाळगावकर, अरुण केटकाळे, काशिनाथ जगदाळे, किरण कटके, बसगोंडा बिरादार, गोविंद टिळंगे, डॉ. कुबेर मगदूम, सुधाकर काळे, जगन्नाथ पोटे, बाबासाहेब हावले, सर्जेराव घोरपडे, एम. के. कांबळे, कुमार माणकापूरे, हेमंत कवठे, लक्ष्मण घंटा, ज्ञानदेव मेटे, सौ. सुरेखा खोंद्रे, सौ. मनीषा कोष्टी, श्रीमती जयश्री चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.