
जागतिक योग दिनानिमित्त शनिवार 21 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सकाळी 6.30 वाजता पंचगंगा नदी घाट परिसरातील रेणुका मंदिराच्या प्रांगणात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
21 जून हा दिवस दरवर्षी जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रेणुका मंदिराच्या प्रांगणात आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, विविध सेलप्रमुख व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इचलकरंजी भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.