
इचलकरंजी : २१ जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शहरामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्कार व गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण दिवसभर सूर्यनमस्कार घालण्याचे ही पहिलीच वेळ आहे.
योगाचार्य संगु गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश क्लब आॅफ इचलकरंजी, एस.एस.वाय.एस. मित्र परिवार यांच्यावतीने शनिवारी पहाटे ६ ते सायंकाळी ७.१५ वाजेपर्यंत मंगलमूर्ती टॉकीजजवळील महेश क्लबमध्ये योग दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी संपूर्ण दिवसभर सूर्यनमस्कार व गायत्री यज्ञ करण्यात येणार आहे. तसेच त्याच ठिकाणी यामध्ये सहभागी होणाºया सादकांना प्रमाणपत्र, सूर्यनमस्कारचे छायाचित्र दिले जाणार आहे. तरी यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.