
इचलकरंजी : मुंबई येथे झालेल्या कॅप्टन एस. जे. इजिकल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील मँचेस्टर सिटी रायफल अँड पिस्टल शुटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी अतिशय कमी कालावधीत भरगच्च यश मिळविले. या सर्वांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यामध्ये 10 मी. एअर पिस्टल प्रकारामध्ये प्रथमेश कांबळे, नील सोनटक्के, यश शिंगारे, चेतन वडार यांनी तसेच 10 मी. पीप साईट रायफल प्रकारामध्ये अभय कोरवी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्वांची ऑल इंडिया जी व्ही मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यभरातून 750 नेमबाज सहभागी झाले होते. या खेळाडूंना प्रशिक्षक विनय पाटील, बापू भुईया व तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण व पालकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.