
इचलकरंजी/प्रतिनिधी- येथील हटकर कोष्टी समाज युवक मंडळाच्यावतीने समाजातील दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार व पुरस्कार सोहळा दिमाखदार पार पडला. रविवारी नामदेव भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष शिवकांत अण्णा मेत्री होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जल विभागातील अधिकारी अजय हळदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत योग, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सातत्य याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने यांनी युवकांनी समाजकार्यात सक्रीय सहभाग नोंदवून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर महिला अध्यक्षा शैलेजा कस्तुरे, श्री बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे, समाज उपाध्यक्ष प्रभाकर उरणे यांची उपस्थिती होती.
यावेळी समाजातील ज्येष्ठ बांधव महादेव खानाज व गणेश कोल्हापूर यांना समाज भूषण पुरस्कार, सुनील बिद्रे व राजू कोन्नूर यांना उद्योग भूषण पुरस्कार, तर आनंद हेब्बाळ, प्रशांत तुरंबेकर, प्रकाश सातलगावकर, गणेश झुंजकर आणि केदार मुराळे यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्षा वरुटे, मंजुषा वरुटे, एम. एस. खराडे व रामकृष्ण वाघिरे यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
शैक्षणिक निधी दिल्याबद्दल बसवराज चडचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. युवक मंडळाच्या स्थापनेपासून निस्वार्थी भावनेने कार्यरत असणाऱ्या रजनीकांत लठ्ठे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या हणमंत वाळवेकर, हेमंत कवठे, ऋषिकेश पटनावर आणि महेश मनवाडी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्तम आयोजन युवक अध्यक्ष अमित खानाज, उपाध्यक्ष हेमंत वरुटे, सेक्रेटरी दीपक वस्त्रे, खजिनदार ऋषिकेश हळदे, कार्यक्रम प्रमुख कुणाल सांगले, विनायक वरुटे, रजनीकांत लठ्ठे, आनंद हेब्बाळ, पवन तेलसिंगे, चैतन्य नेजे, वैभव होनमुटे व अन्य कार्यकर्त्यांनी केले.