
इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांना आपआपल्या वार्डमध्ये असलेल्या ब्लॅक स्पॉटचे ब्युटिफिकेशन करणेचा उपक्रम राबविणेचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार आरोग्य विभागातील सर्वच 25 वॉर्डमध्ये उपायुक्त अशोक कुंभार आणि आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, संबंधित वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचारी यांनी ब्लॅक स्पॉटचे ब्युटीफिकेशन केले.
त्यामध्ये गेस्ट हाउस जवळ, शहा बोळ (कलाकृती – बाकडे), बौद्ध विहार (कलाकृती- बाकडे)
व्यंकटराव हायस्कूल मागे (टायरमध्ये वृक्षारोपण), ब्रह्मकुमारी चौक (टायर झुंबर), लालनगर आरोग्य केंद्र (सिमेंट पाईप मध्ये वृक्षारोपण), कत्तलखान्यानजीक (टायर मध्ये वृक्षारोपण), अण्णाभाऊ साठे कमानजवळ (कुंडीमध्ये वृक्षारोपण), हिरकणी हॉटेल जवळ सर्वोदय नगर (टायरमध्ये वृक्षारोपण), एस.टी. स्टँड परिसर (कुंडीमध्ये वृक्षारोपण), विजय कृषी सेवा केंद्र नजीक (कुंडीमध्ये वृक्षारोपण), दुर्गा माता मंदिर जवळ (ट्रॅक्टर टायरमध्ये वृक्षारोपण), षटकोन चौक (वृक्षारोपण), स्टार वजन काटाजवळ (टायरमध्ये वृक्षारोपण),
जुने शिवाजीनगर पोलीस स्टेशन नजीक (लोखंडी भंगारातुन कलाकृती), विवेकानंद कॉलनी (टायर पासून बाकडे), भाग्यरेखा टॉकीज जवळ (लाकडापासून शोपीस), विराट हनुमान मंदिर जवळ (टायर पासून सेल्फी पॉईंट), हॉटेल उपवन जवळ (टायरपासून कलाकृती), नारायणी मंगल कार्यालय स्टेशन रोड (सिमेंट पाईप पासून कलाकृती), संजय फौड्री समोर (टायरपासून कीटक कलाकृती), चौंडेश्वरी कॉलनी विनायक हायस्कूल जवळ (रांगोळी पासून कलाकृती), शहापूर रोड आर.टी.ओ. ऑफिस समोर (टायरपासून फ्लॉवर पॉट), तारदाळ रोड, चेतना पतसंस्था जवळ (टायर पासून मोटरसायकल) याचा समावेश आहे.
अशा विविध ठिकाणी ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन (सौंदर्यीकरण) केलेल्या ठिकाणी आयुक्त पल्लवी यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या समवेत भेट देऊन पाहणी केली. सर्वच सफाई कर्मचार्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान त्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले.