
‘निराधारांचा आधार’ — तानाजी पोवार यांचा आदर्श मार्ग
इचलकरंजी : विनायक कलढोणे
शहरातील दलित, भटक्या-विमुक्त, दुबळ्या घटकांचा हक्काचा नेता म्हटलं की, नाव समोर येतं — तानाजी पोवार. महापालिकेत तीन वेळा नगरसेवक, सलग तीन वर्ष उपनगराध्यक्ष, त्यानंतर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास घडवला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
तानाजी पोवार यांना इचलकरंजी महापालिकेत ‘टीपी’ म्हणून ओळखलं जातं. काहींना वाटेल, हा ‘टाऊन प्लॅनिंग’चा संकेताक्षर! पण स्थानिक राजकारणात आणि समाजकारणात ‘टीपी’ म्हणजे तानाजी पोवारच. कारण, त्यांच्या नावातच नव्हे तर कामातही ‘शहर रचना’ आणि जनसेवेची बांधिलकी खोलवर आहे.
गत तीन दशकांपूर्वी माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केलेल्या तानाजी पोवारांनी आजवर आपल्या मार्गदर्शकांशी निष्ठा राखली. राजकीय बदलाच्या वादळातही त्यांनी आपले बंध जपले. सध्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली तानाजी पोवार भाजपमध्ये ठामपणे उभे आहेत.
लोकसभेपासून विधानसभा निवडणुकांपर्यंतच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी आपल्या नेत्यांशी प्रामाणिक राहून आपली कर्तव्यपूर्ती केली, हे विशेष.

२०२५ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री प्रकाशआण्णा आवडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने व आमदार राहुल आवाडे यांच्या विजयी दौडीत अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यात तानाजी पोवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पक्षात त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच मतदार संघातील संघटन अधिक बळकट झाले आणि भाजप – शिवसेना युतीला निर्णायक यश मिळाले. पोवार यांनी निवडणूक काळात पक्षाच्या रणनीतीची अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह टिकवून ठेवला, त्यामुळे त्यांना पक्षात विशेष मान्यता लाभली आहे.
भाजपमध्ये आल्यानंतर तानाजी पोवार यांनी गेल्या दहा वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांनी घनिष्ठ नातेसंबंध ठेवले असून त्यांच्या प्रत्येक हाकेला तत्काळ धावून जातात. प्रशासकीय पातळीवर कुठलीही अडचण आली, तर ती मार्गी लावण्यासाठी पोवार स्वतः पुढाकार घेतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळतो. याच कारणामुळे भाजपमध्ये तानाजी पोवार यांना मानणारा आणि त्यांच्या मागे उभा राहणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक समस्या, मग ती ड्रेनेजची असो वा गरजूंच्या रेशनची हातगाडी, ठेलेवाला — तानाजी पोवार मध्यस्थी करून सोडवतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल गोडवा गायला जातो. त्यांच्या शैलीबद्दल सांगायचं झालं, तर ‘‘दुश्मन नाही, समोर येईल तो आपला दोस्त; आणि नडून आलेल्या माणसाचं काम हातो हात करायचं,’’ हा मंत्र त्यांनी अंगीकारला. त्यामुळेच महापालिकेत ‘महापौर कोण?’ या चर्चेत अनेकदा ‘‘तानाजी पोवारसारखा महापौर हवा,’’ असं ऐकायला मिळतं.
गत साडेतीन वर्षांपासून इचलकरंजी महापालिकेत प्रशासक राज आहे. तरी तानाजी पोवार यांच्या दरबारात नागरिकांची दैनंदिन गर्दी कमी झालेली नाही. सत्ता असो वा नसो, त्यांनी कोणीही आपल्या दारात रिकामा जाऊ दिला नाही.
आज शहरभर एक म्हण प्रचलित झाली आहे — ‘‘ज्याला नाही कुणी वाली, त्याला ‘टीपी’ वाली!’’
म्हणजेच, ‘‘ज्याचा कोणी नाही, त्याचा तानाजी पोवार वाली!’’
