
इचलकरंजी/प्रतिनिधी
मुस्लिम समाज सुलह सेवा संस्था, इचलकरंजी यांच्या वतीने मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा देण्यात आला.

यावेळी संस्थेने मागील अडीच ते तीन वर्षांत विविध सामाजिक प्रश्न व वाद सुलह मार्गाने निकाली काढल्याची माहिती अधिकार्यांना देण्यात आली. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वच पोलीस अधिकार्यांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच भविष्यात अशाच पद्धतीने शांततेत प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मसऊद गडकरी, उपाध्यक्ष जावेद मोमीन, सेक्रेटरी बद्रे आलम देसाई, खजिनदार रहमान मुल्ला, सदस्य मौलाना जावेद चौधरी, मौलाना जावेद गवंडी, जाफर मुजावर, युसुफ तासगावे, नजीर (जाॅनी) पट्टेकरी, शकील बागवान, मुंतजीर बागवान, मेहबूब पठाण, युसुफ दुर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.