
इचलकरंजी : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह तर्फे समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत इचलकरंजी महानगरपालिका संचलित आधार शहरी बेघर निवारा केंद्रा साठी आवश्यक जीवनावश्यक साहित्य भेट देण्यात आले. या अंतर्गत 30 काॅट, गाद्या, ब्लँकेट व टीव्ही संच सुपूर्त करण्यात आले. या सुविधेमुळे निवारा केंद्रात राहणाऱ्या बेघर नागरिकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. पल्लवी पाटील उपस्थित होत्या. त्यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “बेघर व वंचित घटकांसाठी सुविधा निर्माण करणे ही खरी समाजसेवा आहे. रोटरी क्लबने उचललेले पाऊल इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे.” रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर अरुण भंडारे यांनीही आपले विचार व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “रोटरी ही फक्त एक संस्था नसून ती समाज परिवर्तनाची चळवळ आहे.”
या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले, सेक्रेटरी मयुर पाटील, (Project Chairman) प्रकाश मोरबाळे, (Co-Chairman) सतीश मेटे व अमित खानाज , रवी कोळेकर विवेक हासबे , गणेश निकम, अरुण चौगुले, गिरीश कुलकर्णी, राजेश कोडुलकर, विठ्ठल तोडकर,सुधीर लाटकर, सुनील मांगलेकर, आर.बी.पाटील, कल्पेश मेहता व रोटरॅक्ट क्लब चे सर्व सदस्य यांची उपस्थिती लाभली. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह समाजातील वंचित, उपेक्षित व गरजू घटकांसाठी सातत्याने उपक्रम राबवत असते. आधार शहरी बेघर निवारा केंद्रातील ही साहित्य भेट केवळ मदत नव्हे तर मानवतेचा एक जिवंत संदेश असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.