
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी शहराच्या प्रभाग क्रमांक १२ मधील युवा नेतृत्व स्टिफन रामदासजी आवळे यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णा यांच्या विचारांचा वारसा जोपासत स्टिफन आवळे यांनी समाजातील निराधार, गोरगरीब, बेवारस रुग्णांना मदतीचा हात देत त्यांच्या उपचारांपासून ते बेवारस मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.
वयाच्या १७ व्या वर्षापासून ते २५ व्या वर्षापर्यंत त्यांनी सातत्याने अन्नदान, ब्लँकेट वाटप अशा सामाजिक कार्यांमध्ये स्वतःला झोकून दिले आहे. यंदाही वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि झाडे लावा उपक्रम राबवण्यात आला. मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोठ्या संख्येने युवक-युवतींनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवळे यांनी स्वच्छता, पायाभूत सुविधा, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण, महिलांवरील अन्याय-अत्याचार, वाढते गुन्हेगारीकरण आणि अमली पदार्थांचा धोका अशा गंभीर सामाजिक समस्यांवर लक्ष वेधत परिवर्तनवादी संदेश दिला. कार्यक्रमास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवले गेलेले स्टिफन आवळे यांच्या कार्याची दखल आज जिल्ह्याबाहेरही घेतली जात आहे. वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याची ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.”