इचलकरंजी | चंदूर रोड दुर्गामाता मंदिर परिसरातील खुल्या भूखंडावर ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने केलेले अतिक्रमण गुरुवारी महानगरपालिकेच्या वतीने पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येऊन जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारक आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला.

जुना चंदूर रोडवरील दुर्गा माता मंदिर नजीकच्या रिव्हिजन सर्वे नंबर 407 हिस्सा क्रमांक 1 अ मधील खुल्या भूखंडावर ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने अतिक्रमण केले होते. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर आयुक्तपल्लवी पाटील यांच्या आदेशाने व उपायुक्त नंदू परळकर व सहायक आयुक्त विजय राजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात सदरचे अतिक्रमण हटविण्यात येऊन जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी काही प्रमाणात विरोध झाल्याने किरकोळ वाद झाला.

ही कारवाई सहा. नगररचनाकार अविनाश बन्ने, हरिशचंद्र पाटील, अमरजित लकडे, भूमापक अनिल सुतार, सावकार चौगुले, मिळकत विभाग अधिक्षक श्रीकांत पाटील, वरिष्ठ लिपिक सदाशिव गोनुगडे, लिपिक अनिल पाटील, कोर्ट विभागाकडील विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, वरिष्ठ लिपिक कृष्णा आवळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे व कर्मचारी यांच्यासह कारवाई पूर्ण केली.