
गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी आरोपी राहुल आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दरथरथ नावाची व्यक्ती २८ डिसेंबर रोजी घरीच आली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना त्याचा मृतदेह ढोलकुंवा गावाच्या जवळ आढळून आला. याप्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.