
इचलकरंजी | डीकेटीई संस्थेचे स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या आकर्षणाचा विषय आहे. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाड्यात घडवितात. ‘जयोस्तुते 2025‘ स्नेहसंमेलनाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ढोलपथकाने मानंवदना देवून मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांच्या हस्ते शिवरायांच्या चित्रफलकांचे अनावरण करण्यात आले.
डीकेटीईत स्नेहसंमेलनात डान्स शो, व्हरायटी शो, रक्तदान, जिनीअस, फोटोग्राफी, फिशपाँड अशा भव्य कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 100 हून अधिक विद्यार्थी व स्टाफ यांनी रक्तदान केले.
डीकेटीईचा ट्रॅडीशनल डे अर्थात पारंपरिक पोषाख दिन हा वेगवेगळया कलाकृतीतून संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालून शिवगर्जना ढोलपथकाने मानवंदना देवून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्याबरोबर लेझिम, हलगी व मर्दानी खेळांचे दर्जेदार प्रात्यक्षिके सादर केली. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात आणि कौतुकाची थाप मिळवितात.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, आमदार राहुल आवाडे, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर रवी आवाडे, मौश्मी आवाडे, सानिका आवाडे तसेच सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. यावेळी डायरेक्टर प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी कानिटकर प्रा.ए.व्ही.शहा, डॉ. ए.आर.बलवान, प्रा.ए.यु.अवसरे, विघार्थीप्रतिनिधी यश पाटील, शाम कोरवी, सौरभ शहा, पार्थ लाड यांचेसह सर्व डीन्स, विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.