
इचलकरंजी | सद्या तरुणाई हिंसा, नशा आणि सोशल मीडियाच्या मोहजालात गुरफटली आहे. या तरुणाईला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. हे काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास समजावून सांगत जबाबदार सक्षम नागरिक बनवण्यासाठी आता शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. शिवजयंतीनिमीत्त येथील मराठा मंडळाच्यावतीने विविध विभागातील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी अध्यक्षीय मनोगतात समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकांनी योगदान देण्याचे आवाहन केले. प्रारंभी मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदराव उदाळे यांनी स्वागत तर उपाध्यक्ष सचिन हळदकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल चोरगे (माजी प्राचार्य गोविंदराव ज्युनिअर कॉलेज), प्रा. दिलीप भोसले (ंमाने ज्युनिअर कॉलेज रुकडी), श्रीकांत चव्हाण (मथुरा हायस्कुल), पांडुरंग हजगुळकर (सरस्वती हायस्कूल), वैशाली पवार (बालाजी हायस्कुल), पांडुरंग शिऊडकर (हु.बाबु गेनु विद्यामंदिर क्र.28), मंगल चौगुले (पु.साने गुरुजी विद्या मंदिर), संगिता पाटील (अशोका हायस्कुल), गीता कचरे (सईबाई बालमंदिर) आणि रामचंद्र माने (गंगामाई हायस्कुल) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संभाजी काटकर, वसंत पाटील, शिवाजी जगताप, पुंडलिकभाऊ जाधव, प्रकाश शिंदे, प्रविण पाटील, सचिव आनंदा वाझे, खजिनदार बाळू सावंत, संचालक राजाराम लोकरे, सुनिल शेलार, वसंत मुळीक, उल्हास सुर्यवंशी, सुहास जांभळे, संभाजी खवरे, प्रकाश नेमिष्टे, राजेंद्र बचाटे, दादासो पाटील, गणेश घाटगे, कार्यालयीन सचिव सचिन रणदिव, प्रा. युवराज मोहिते यांच्यासह मराठा मंडळाचे संचालक, सार्वजनिक शिवजयंती उत्सव कार्यकारीणी सदस्य आणि समाजबांधव उपस्थित होते.