
इचलकरंजी | टाकवडे वेस येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे साजरी केली जाणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या जयंतीच्या आयोजनासाठी 2025-26 च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

या नव्या समितीत सतिश कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर लखन कांबळे उपाध्यक्षपदी, तातोबा कांबळे खजिनदारपदी, आणि दयानंद करडे सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच सौरभ कांबळे, रॉबिन चंदनशिवे, विशाल कांबळे आणि गिरीश कांबळे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या निवडीमुळे संपूर्ण बौद्ध समाजामध्ये उत्साहाचे वातावरण असून, गावभाग व टाकवडे वेस परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून, नव्या कमिटीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.