
इचलकरंजी : येथील दि इचलकरंजी इंडस्ट्रीयल को-ऑप. इस्टेट या संस्थेच्या चेअरमनपदी राहुल प्रकाश खंजिरे आणि व्हाईस चेअरमनपदी महादेव शंकर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक पार पडली.
संस्थेची सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. नुतन संचालक मंडळात राजेंद्र महादेव बिद्रे, महादेव शंकर कांबळे, सुनिल सातगोंडा पाटील, निलेश बापुलाल चंगेडीया, सागर विजय कोईक, उदय शंकर आदर्शे, विजयकुमार रामस्वरुप पारीक, राहुल प्रकाश खंजिरे, प्रकाश राजाराम नवनाळे, आनंद गिरीधारीलाल मालू, किरण हिंदुराव कांबळे, सुहेल दस्तगीर बाणदार, उमा रविंद्र मुरदंडे व हसिना रियाज गैबान आणि आदाप्पा भरमू हांडे यांचा समावेश आहे. सर्व संचालकांची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली.
चेअरमनपदासाठी राहुल खंजिरे यांच्या नांव राजेंद्र बिद्रे यांनी सुचविले. त्याला प्रकाश नवनाळे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमनपदासाठी महादेव कांबळे यांचे नांव आनंद मालू यांनी सुचविले. त्याला सुहेल बाणदार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर नुतन पदाधिकारी व संचालकांचा डी. आर. पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार व्यवस्थापक प्रदीप पोवार यांनी मानले.