इचलकरंजी : मुजावर पट्टी ते तोडकर मळा या भागातील विद्युत तारा जुन्या आणि जीर्ण झाल्या असून त्या तातडीने बदलून त्याठिकाणी एरीयल बंच केबल टाकण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नदीवेस नाका परिसरातील मुजावर पट्टी ते तोडकर मळा हा भाग दाट लोकवस्तीचा परिसर आहे. याठिकाणी बहुतांश कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत. या भागातील विद्युत तारा अत्यंत जुन्या असून जीर्ण होऊन त्या खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे त्याचा धोका वाढला आहे. शिवाय भागातील नागरिकांना घराचे बांधकाम करताना अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत. दुसर्या मजल्याचे बांधकाम करताना या तारांचा अडथळा होत आहेत.
याच भागात काही दिवसांपूर्वी दुसर्या मजल्याचे बांधकाम करताना अनावधानाने विद्युत तारांच्या अडचणी अपघात घडला. परंतु भविष्यात या तारांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीने याकडे वेळीच लक्ष देऊन या भागातील जुन्या व जीर्ण विद्युत तारा बदलून त्याठिकाणी एरियल बंच केबल टाकण्याची मागणी होत आहे.