
इचलकरंजी | भारतीय जनता पार्टीचे इचलकरंजी शहर कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक‘मांनी साजरा करण्यात आला. यावेळी पक्ष ध्वजाचे पूजन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे हस्ते व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली.
स्थापना दिवसाच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरावर पक्ष ध्वज फडकविला होता. पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक‘मात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, पक्ष स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा इतिहास, पक्षाची जडणघडण तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली भविष्यवाणी सांगत पक्ष हा कार्यकत्यांच्या ताकदीवर मोठा झाला असून सध्या देशामध्ये पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जोमाने विकासात्मक कामे करत असल्याचे सांगितले.
पक्ष स्थापना दिन तसेच श्री रामनवमीच्या निमित्ताने स्वरमयी शुभेच्छा मराठी-हिंदी भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीपर चित्रपट गीतांसह श्रध्देय माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवीता असणारा सुरेल अविष्कार स्वर-गोडवा हा कार्यक‘म भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सादर करण्यात आला. कार्यक‘माची संकल्पना शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले यांची होती. गायिका सौ. राधा घोसरवाडकर, गायक मनिष आपटे, गायक पदमाकर कुरकुटे यांनी दर्जेदार गाणी सादर केली. निवेदन संजय सातपुते यांनी केले.यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्र यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दुपारच्या सत्रात राज्याचे मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन कार्यकर्ता संमेलनातुन कार्यकर्त्यांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक‘मास महिला शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, संगांयो समिती अध्यक्ष अनिल डाळ्या, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सौ. उर्मिला गायकवाड, सौ. नीता भोसले, सौ. सपना भिसे, नागुबाई लोंढे, सौ. माधवी मुंढे, सौ. संगीता साळुंखे, सौ. अलका विभूते, महेश पाटील, उमाकांत दाभोळे, दीपक राशिनकर, अरुण कुंभार, भरत जोशी, सुधीर पाटील, मारुती पाथरवट, नामदेव सातपुते, सचिन कोरे, प्रकाश खारगे, प्रदीप मळगे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या सं‘याने उपस्थित होते.